हिंगोली -मनमाड येथून नांदेडला पार्सल पोहोचविणाऱ्या ट्रेलरमधून शिरड-शहापूर ते वसमत रोडवरील धार फाटा येथील साई मंदिराजवळ सहप्रवाशाला गाडी बाहेर फेकून चालकाने पळ काढला आहे. याबद्दल औंढा पोलिसांना कळविताच पोलिसांनी शिरड येथे धाव घेतली. ट्रेलर पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना ट्रेलर चालकाने पळ काढला आहे.
चालत्या ट्रेलरमधून सहप्रवाशाला गाडी बाहेर फेकून चालकाचे पलायन - police
हिंगोली येथे शहापूर ते वसमत रोडवरील धार फाट्याजवळ एका अज्ञात व्यक्तीला ट्रेलरमधून फेकून देत चालकाने ट्रेलरसह पळ काढला होता. काही युवकांनी दुचाकीवरून ट्रेलरचा पाठलाग करत वाई गोरखनाथ येथे ट्रेलरला अडवले. ट्रेलर पोलीस ठाण्यात घेऊन जात असतानाच चालकाने ट्रेलर सोडून पळ काढला आहे.

शिरड-शहापूर पासून काही अंतरावरच एका ट्रेलरमधून एका व्यक्तीला फेकून देत असल्याचे दिसून आले. ही बाब रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असलेल्या काही नागरिकांना समजताच त्यांनी शेजारील तरुणांना या बद्दल कळवले. तरुणांनी ट्रेलरचा पाठलाग करून वाई गोरखनाथ येथे ट्रेलरला पकडले. तोपर्यंत औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिरड शहापूर येथे पोहोचले. ट्रेलरला औंढा येथे आणत असताना, चालकाने शिरड-शहापूर येथे रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभे करून पळ काढला आहे. याप्रकरणी पोलीस ट्रेलर मालकासह चालकाचा शोध घेत आहेत. अज्ञात जखमी व्यक्तीवर औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.