हिंगोली - कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच, आज(बुधवार) जिल्ह्यात २ कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. त्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती सनियंत्रक तथा जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली.
जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपूर्वी दोन संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा नागनाथचे दर्शन बंद
यातील एक हा फिलिफ्लाइन्स येथून 13 मार्च रोजी हिंगोलीमध्ये आला आहे. त्याला कोरोनाची लक्ष जाणवत असल्याने, तो स्वतःहून जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे त्याला विलगीकरण लक्षात ठेवण्यात आले आहे. तर, दुसरा हा कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. त्या ठिकाणी त्याची तपासणी करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्या रुग्णाचे नमुने घेण्यासाठी हिंगोली येथून बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा -हिंगोलीत डेंग्यूने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; परिसरात खळबळ