महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

भाजप नेता जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या, 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाचे पडसाद हिंगोलीतही उमटले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोयल यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.

Nationalist Youth Congress protests in Hingoli
हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

By

Published : Jan 14, 2020, 8:57 AM IST

हिंगोली -भाजप नेता भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली गेली आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हिंगोलीत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोयल यांच्या प्रतिमेला जोडे मारत, याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचे लेखक, जय भगवान गोयल यांचा निषेध...

हेही वाचा... आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत

छत्रपती शिवाजी महाराज यांची या पृथ्वीवर कोणीही बरोबरी करू शकत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत कोणाचीही तुलना करणे, अत्यंत चुकीचे आहे. हा प्रकार केवळ भावना भडकवण्यासाठीच केला असावा ? अशी शंका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीकडून पुस्तक लिहिणाऱ्या गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रदेश सचिव जावेद राज यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा... 'ही' सभ्यता नरेंद्र मोदी कधी शिकणार..काँग्रेसची 'त्या' लेखकाविरुद्ध पोलिसांत तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details