हिंगोली - प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 5 जणांना कोरोनाची लागण स्पष्ट झाली आहे. तर सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) येथील एका 21 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान अकोल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यातील 41 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून, 2 जणांचे अहवाल हे रिजेक्ट केले आहेत. परत त्या दोघांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पुन्हा नव्याने 5 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या 266 - हिंगोली न्यूज
प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 5 जणांना कोरोनाची लागण स्पष्ट झाली आहे. तर सेनगाव तालुक्यातील केंद्रा (बु) येथील एका 21 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान अकोल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते.
नव्याने आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण हे सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झालेले होते. यातील एक 30 वर्षीय रुग्ण हा मन्नास पिंपरी येथील रहिवासी असून, तो दिल्ली वरून आलेला आहे. तर दुसरा पुणे येथून आलेला 31 वर्षाचा रुग्ण हा ताकतोडा येथील रहिवासी आहे. तिसरा रुग्ण हा 16 वर्षीय असून, केंद्रा (बु) येथील रहिवासी आहे. सदरील युवक हा मुंबई येथून आलेला आहे. इतर दोघे हे महिला अन पुरुष मुंबईवरून आलेले असून, हे दोघेही लिंगपीपरी येथील रहिवासी आहेत. हे नव्याने आढळलेले रुग्ण सेनगाव तालुक्यात दाखल होताच त्याना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तर तीन रुग्ण हे बरे झाल्याने त्याना सुट्टी देण्यात आली आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात 266 एवढी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 237 रुग्ण हे बरे झाले आहेत. आता 29 रुग्णावर विविध कोरोना केअर सेंटर, तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 हजार 527 कोरोना संशयितांना दाखल केले होते. त्यापैकी 3 हजार 986 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत 540 दाखल असून, 193 जणांचे अहवाल हे प्रलंबित आहेत.