हिंगोली -जिल्ह्यात तीन दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातले असून, आतापर्यंत चार गायी फस्त केल्या आहेत. तर शनिवारी सेनगाव तालुक्यात वाघाने पाच शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा शेतकऱ्यांवर हल्ला; पाच जण गंभीर जखमी हेही वाचा - नुकसानीचे सर्वेक्षण करायला आलेले अधिकारी अडकले गाळात
सेनगाव तालुक्यातील सुकळी या गावांमध्ये वाघाने हल्ला केला आहे. जखमी झालेले पाचही शेतकरी शेतामध्ये जनावरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान झाडांमध्ये दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक या शेतकऱ्यावर हल्ला केला. यामध्ये सुनील कबाडे हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला सेनगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गेल्या आठ दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामधून आलेल्या या वाघाने हिंगोली जिल्ह्यात अक्षरशः दहशत माजवली आहे. वनविभाग या वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, अद्यापपर्यंत या वाघावर वन विभागाने नियंत्रण मिळवले नाही. त्यामुळे हा वाघ आता जनावरांसह माणसांवरही हल्ले करीत आहे.
सुकळी येथील शेतकऱ्यावर हल्ला केल्यानंतर हा वाघ याच परिसरातील केशव खिल्लारे यांच्या शेतात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दरम्यान वनविभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाला असून वाघाचा शोध घेत आहेत. वाघाने आता माणसावर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जरी वनविभागाकडे या वाघाची मानवावर हल्ले न करण्याचा इतिहास असली तरी आता वाघ हल्ले करत सुटला आहे. एवढेच नव्हे तर हा वाघ गावांमध्ये शिरुन गोठ्यातील जनावरांवर देखील हल्ले करीत आहे.
तब्बल ५० वर्षानंतर हिंगोलीतच नव्हे तर मराठवाड्यात पहिल्यांदाच वाघाचे वास्तव्य आढळले आहे. तिन दिवसांपूर्वी वाघाने गायींचा फडशा पाडला होता. यामुळ शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
चार दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या वाघावर वनविभाग कशा प्रकारे नियंत्रणात आणू शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले. कधी नव्हे ते वाघ जिल्ह्यामध्ये शिरल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काम लागले आहे. तरीदेखील वनविभागाला वाघ ताब्यात घेण्यास अपयश आले आहे.
हेही वाचा - अपक्षाचा पाठिंबा आणि भाजपचा आमदार यात फरक - मुनगंटीवार