महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिगोंलीमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले - stole ATM in Hingoli

वसमत शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवुन नेल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पळवून नेलेले एटीएम शहरापासून 2 किमी अंतरावर सापडले. त्या एटीएममध्ये 30 लाख 30 हजार 50 रुपये एवढी रक्कम होती.

चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले

By

Published : Sep 18, 2019, 4:45 PM IST

हिंगोली- वसमत येथील एटीएम चोरट्यांनी पळवून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका चोरट्यास ताब्यात घेतले. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शहरापासून काही अंतरावर एटीएम आढळून आले.

चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केले

हेही वाचा - हिंगोलीत राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाची पक्षाला सोडचिठ्ठी, वंचितमध्ये प्रवेश

वसमत शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवुन नेल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पळवून नेलेले एटीएम शहरापासून 2 किमी अंतरावर सापडले. त्या एटीएममध्ये 30 लाख 30 हजार 50 रुपये एवढी रक्कम होती. एटीएम वसमत शहराच्या अतिवर्दळीच्या ठिकाणी असून ते चोरट्यांनी पळविले. चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम न फुटल्याने, एटीएम मधील रक्कम वाचली. तर सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांपैकी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिसाचाच अत्याचार; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्याकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र, या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details