महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाम्पत्याला उतरुन वाहन जाळले, हिंगोलीत लुटारुंची टोळी पुन्हा सक्रिय - हिंगोली ताज्या बातम्या

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा या ठिकाणी रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी एक चारचाकी वाहन अडवले. वाहनातील सर्वांना निघून जाण्यास सांगितले व वाहन पेटवून दिले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

FIRE CAR
FIRE CAR

By

Published : Jul 19, 2020, 1:16 PM IST

हिंगोली- बऱ्याच दिवसानंतर पुन्हा हिंगोली तालुक्यातील माळहिवरा परिसरात दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाली आहे. रविवारी (दि. 19 जुलै) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन अडवून, त्यातील चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यातील दाम्पत्याला बाहेर काढून वाहन पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, याप्रकरणी अजून तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे अनेकदा वाहने अडवून लुटण्याच्या घटना मागील काही वर्षांपूर्वी घडत होत्या. मध्यंतरी या घटनांना आळा बसला रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ह्या घटना ब्रेक झाल्या. पण, रविवारी पहाटे दोनच्या सुमारास नांदेडहून वाशिमकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला अडवून त्यातील चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या वाहनांमध्ये असलेल्या दाम्पत्याला बाहेर काढून त्यांनाही तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने जीव वाचविण्यासाठी त्या ठिकाणाहून पळ काढला. दाम्पत्य काही अंतरावर जात नाहीत तोपर्यंत दरोडेखोरांनी ते चारचाकी वाहन पेटवून दिले. यामध्ये चारचाकी वाहनू पुर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेने वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी देखील याच ठिकाणी दोन वाहनधारकांना लुटण्यात आले होते. मात्र, त्यांनी कुठेही तक्रार केली नसल्याने हा प्रकार उघडकीस आला नव्हता या ठिकाणा नेहमीच अशा घटना घडत असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश बरडे, जमादार सोपान सांगळे यांनी धाव घेतली. याबाबत अजून कोणताही गुन्हा नोंद झाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details