महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली - शारदा बेलसरे खून न्यूज

शारदा मांगीलाल बेलसरे (रा. धामणी ता. अचलपूर जि. अमरावती) असे या मृत तरुणीचे नाव आहे. शारदा ही अभियंता असलेल्या आपल्या प्रियकरासोबत १८ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गेली असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर हत्ता परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाच्या पाण्यात शारदाचा मृतदेह आढळला आहे.

'त्या' तरुणीचा खुन गळा आवळून, ओळख पटली

By

Published : Nov 3, 2019, 12:55 AM IST

हिंगोली -सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा परिसरात तलावात फेकून दिलेल्या तरुणीची ओळख पटली असून, सदर तरुणी अमरावती जिल्ह्यातील धामणी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रेम प्रकरणातून या तरुणीचा गळा आवळून खून झाला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ

शारदा मांगीलाल बेलसरे (रा. धामणी ता. अचलपूर जि. अमरावती) असे या मृत तरुणीचे नाव आहे. शारदा ही अभियंता असलेल्या आपल्या प्रियकरासोबत १८ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गेली असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानंतर हत्ता परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाच्या पाण्यात शारदाचा मृतदेह आढळला आहे.

सदर तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर सेनगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी कोणताही पुरावा न सापडल्याने या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, तपास अधिकारी सपोनि बाबुराव जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मृतदेहाचे फोटो व सविस्तर माहिती व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले.

पोलिसांच्या या प्रयत्नांना अवघ्या चोवीस तासाच्या आत यश आले. मृत तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी सेनगाव पोलिसांशी संपर्क साधला. तरुणीचा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details