महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांच्या आडमुठेपणामुळे गर्भवती म्हैस दगावली, शेतकऱ्याचे नुकसान - hingoli latest news

बाजारातून म्हैस घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या वाहनाला तब्बल तीन तास विनाकारण थाबंवून घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये घेऊन त्यांचे वाहन सोडण्यात आले. ती म्हैस गर्भवती असल्याने व तिला योग्यवेळी उपचार न मिळाल्याने त्या म्हशीचा मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 13, 2020, 9:22 PM IST

Updated : Sep 14, 2020, 9:37 AM IST

हिंगोली- बऱ्याच जणांनी पारंपरिक व्यवसाय बदलून, उपजीविका भागविण्यापुरता व्यवसाय सुरू केला आहे. तर काही शेतकरी हे दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. असेच काही शेतकऱ्यांनी खांबगाव येथून म्हशी विकत आणल्या होत्या. दरम्यान, ओंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रक अडवून तीन तास थांबवून धरला. शेतकऱ्यांनी गर्भवती म्हैशीची परिस्थिती सांगितली. मात्र, पोलीस कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते, अशी तक्रार शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकाकडे केली आहे.

पोलीस शिपाई इक्बाल सिंकदर शेख, गोरे, अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कोरोना काळात प्रत्येक जण उत्कृष्ट कर्तव्य बजावून या कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याच प्रशासनात असे ही काही कर्मचारी आहेत, जे की त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार ओंढा नागनाथ येथे घडला आहे. गंगाप्रसाद मारोतराव ढोरे (रा. वखारी ता. वसमत) यांनी खामगाव येथून दुग्ध व्यवसायासाठी खरेदी केलेल्या म्हैशी वाहनाने घेऊन येत होते. त्यांना विदर्भात कुठे ही कुणी अडविले नाही. मात्र, हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर ओंढा नागनाथ पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवून धरले. तर शेतकरी हे पोलीस कर्मचाऱ्यांना विनवणी करत होते. मात्र उलट कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना धाक दाखवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. शेवटी सहा हजार रुपये घेतले आणि रात्री 9 वाजता वाहन सोडले.

पण, घरी पोहोचल्यानंतर वाहनातील म्हैस उतरवत असताना, एक म्हैस दगवल्याचे आढळून आले. शेवटी ढोरे या शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे धाव घेऊन संबधीत कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, अजून तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. एवढ्या विदारक परिस्थितीत शेतकऱ्यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराने पशुपालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकरणी ओंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा -हिंगोलीत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; खरीप पिकांना मिळणार संजीवनी

Last Updated : Sep 14, 2020, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details