महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर तिसऱ्या दिवशी आढळला वाहून गेलेला मृतदेह - flood in hingoli

कुंडलिक गोविंदा असोले, धुरपताबाई कुंडलिक असले (रा. आसोलवाडी तालुका कळमनुरी) हे सालगडी म्हणून काम करत होते. ते आपल्या कुटुंबासह शेतातील आखाड्यावर राहत असत. शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ओढ्यातून जात असताना, दोघेही पाण्यात वाहून गेले.

death
अखेर तिसऱ्या दिवशी आढळला वाहून गेलेला मृतदेह

By

Published : Jun 21, 2020, 12:52 PM IST

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील अस्सल वाडी गावाजवळ ओढ्याला आलेल्या पुरात दोघे पती-पत्नी गाडी बैलांसह वाहून गेले होते. पत्नीचा मृतदेह शनिवारी आढळला तर आज (रविवारी) पहाटे तिसऱ्या दिवशी पतीचा मृतदेह शोधून काढल्यास बचाव पथकाला यश आले आहे. बचाव पथकाने सलग तीन दिवस पाण्यामध्ये या दोघांचाही शोध घेण्यासाठी गोताखोर शमशेर खा पठाण यांच्यासह आदीनी परिश्रम घेतले त्यांच्या शोध कार्याला आज यश आले.

कुंडलिक गोविंदा असोले, धुरपताबाई कुंडलिक असले (रा. आसोलवाडी तालुका कळमनुरी) हे सालगडी म्हणून काम करत होते. ते आपल्या कुटुंबासह शेतातील आखाड्यावर राहत असत. शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दिवशी हे दोघे पती-पत्नी आखाड यावरून कळमनुरी येथे दळण्यासाठी गेले होते. तर पावसाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याने हे दोघेजण बैलगाडीने आखाडाकडे निघाले. आखाडापासून काही अंतरावर असलेल्या ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यामध्ये बैलगाडीसह हे दोघेजण वाहून गेले. बैल पोहत पोहत बाहेर निघाले तर दोघेजण वाहत गेले.

घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा पाण्यामध्ये शोध घेण्यासाठी बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत कार्य केले. मात्र, अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. दु,सऱ्या दिवशी पहाटे साडे पाच वाजेपासून शोधकार्यास सुरुवात केली असता साडेसात वाजता धुरपताबाई यांचा मृतदेह सापडला. तर पुंडलिक यांचा शोध सुरू होता.

आज पहाटे सुरू केलेल्या शोधकार्यात कुंडलिक आसोले यांचा मृतदेह सापडला. सलग तीन दिवस पाण्यामध्ये मृतदेह राहिल्याने मृतदेह फुगला होता. घटना घडली त्या दिवशीपासून ओढ्याच्या अवतीभोवती नागरिक व नातेवाईक थक्क बसून होते. अखेर तिसर्‍या दिवशी गोताखोर समशेर खा पठाण यांनी आपल्या जीवाची बाजी लावून मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. घटनेने संपूर्ण कळमनुरी तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

शेवटच्याच ठरल्या त्या बांगड्या -

कळमनुरी येथे दळण्याच्या निमित्ताने आलेल्या धुरपताबाई यांना त्यांच्या पतीने बांगड्या भरण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत धुरपताबाई यांनी बांगड्या भरल्या होत्या. नंतर घराकडे निघाले तर ही मन हेलावून टाकणारी घटना घडली, त्यामुळे त्या बांगड्या ह्या शेवटच्या ठरल्या. कुंडलिक यांचा मृतदेह आढळतात नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.

ABOUT THE AUTHOR

...view details