हिंगोली -शहरातील बस्थानकात आढळलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. बाळ सुखरूप असले तरी आईचे दूध न मिळाल्याने बाळ रडत होते, हे पाहून कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी शेख सलमा यांचे ममत्व जागे झाले, अन् त्यांनी लागलीच बाळाला जवळ घेऊन स्तनपान केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तर त्या निर्दयी मातेचा पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध घेतला जात आहे. हिंगोली शहरातील बस स्थानकातील चौकशी कक्षाजवळ शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास एक पाच ते सहा महिन्याचा चिमुकला कपड्यात गुंडाळून ठेवत निर्दयी आईने पलायन केले.
सदरील धक्कादायक बाब ही पहाटे
पहाटे बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. अन् आवाजाच्या दिशेने धाव घेतली, तर बाळ कपड्यात गुंडाळून ठेवलेले आढळून आले. आईचा शोध घेतला मात्र कुठे ही आई आढळून न आल्याने, प्रवाशांनी ही बाब पोलीस प्रशासनास कळविली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बाळाला ताब्यात घेतले अन् जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.