हिंगोली-जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 10 कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 585 वर पोहोचली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्या उपचारामुळे एकूण 13 रुग्ण हे बरे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली शहरातील महादेव वाडी भागात 1, पेन्शनपुरा 1, तोफखाना 2 आदर्श कॉलेज भागातील यशवंत नगर 1, गाडीपुरा 1 अष्टविनायक नगर 1, हिंगोली तालुक्यातील सवड येथे 1 आणि वसमत शहरातील मंगळवार पेठ भागात 1 येथील व्यक्तींचा समावेश आहे.
सध्या हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 585 झाली आहे. 385 रुग्ण बरे झाले आहेत. तर 194 रुग्णावर विविध कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या पैकी 14 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका 28 वर्षीय रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे 15 रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.