हिंगोली - जिल्ह्याचे मागील तीन दिवसांपासून तापमान एवढे वाढले आहे, की कडक उन्हाने शरीर अक्षरशः भाजून निघत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान कमाल ४६ अशंसेल्सिअस आणि किमान ३० अंशसेल्सिअस, असे होते. तापमान वाढतच असल्याने सावलीतही उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
पहिल्यांदाच या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे रविवारी रेकॉर्ड ब्रेक तापमान असल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याला वाढत्या तापमानाचा तडाखा; ४६ अंशसेल्सिअसची नोंद
हिंगोली जिल्ह्याचे मागील तीन दिवसांपासून तापमान एवढे वाढले आहे, की कडक उन्हाने शरीर अक्षरशः भाजून निघत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान कमाल ४६ अशंसेल्सिअस आणि किमान ३० अंशसेल्सिअस असे होते. पहिल्यांदाच या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर जाऊन पोहोचला आहे.
सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचे तापमान ४० ते ४२ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. हिंगोली जिल्ह्याचे तापमान चक्क ४६ अंशावर पोहोचल्याने मोठ्य़ा प्रमाणावर उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. टिनपत्र्यांच्या घरात तर मोठ्या प्रमाणात वाफा जाणवत आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईचे ग्रहण असल्याने काही भागात उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई सर्वाधिक जास्त जाणवत असल्याने, टँकर्सची संख्या ४० पेक्षा अधिक झाली आहे.