महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहो मीच आहे खरा सुभाष वानखेडे....काँग्रेसच्या उमेदवारावर आली वेळ - Subhash Wankhede

मतदार संभ्रमात पडू नयेत म्हणून, काँग्रेसच्या वानखेडेंना प्रचारात मीच खरा सुभाष वानखेडे आहे, असे डोकं पिटकून पिटकून सांगण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केलेल्या विकासाचे कामे सांगण्याऐवजी मीच खरा उमेदवार असल्याचे त्यांना सांगावे लागत आहे.

सुभाष वानखेडे

By

Published : Apr 6, 2019, 5:28 PM IST

Updated : Apr 6, 2019, 10:29 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची सध्या जोरात रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे उमेदवार उन्हातान्हाची जराही पर्वा न करता प्रचारात मग्न आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण या निवडणूकीत सुभाष वानखेडे नावाचे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सुभाष वानखेडे

मतदार संभ्रमात पडू नयेत म्हणून, काँग्रेसच्या वानखेडेंना प्रचारात मीच खरा सुभाष वानखेडे आहे, असे डोकं पिटकून पिटकून सांगण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केलेल्या विकासाचे कामे सांगण्याऐवजी मीच खरा उमेदवार असल्याचे त्यांना सांगावे लागत आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. यात महायुतीकडून हेमंत पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड अन् काँग्रेस कडून सुभाष वानखेडे यांच्यासह अजून २५ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्याच विरोधात त्यांच्याच नावाचे हम भारतीय पार्टीकडून सुभाष नागोराव वानखेडे, बहुजन महापार्टीकडून सुभाष परसराम वानखेडे, अपक्ष सुभाष काशीबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना मीच खरा सुभाष वानखेडे असल्याचे सांगावे लागत आहे. एकाच नावाचे ५ उमेदवार रिंगणात असल्याने, आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचण्यापेक्षा सर्व प्रथम नावाचेच विश्लेषण प्रचारात करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर मीच खरा सुभाष वानखेडे असल्याची नामुष्की ओढवल्यानेही हिंगोली लोकसभा मतदार संघात एकच चर्चा रंगत आहे.

काँगेसच्या सुभाष वानखेडे यांच्या प्रचार सभा तीन ते चार दिवसांपासून सुरू झाला असल्या तरी आज कुठे त्यांचा प्रचार रथ तयार झाला आहे. त्यामुळे या प्रचार रथाच्या माध्यमातून ही सुभाष वानखेडे यांचा प्रचार होणार आहे. मात्र प्रत्येक प्रचार सभेत काँग्रेसचे सुभाष वानखेडे इतर विकासाच्या मुद्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या नावावरच सर्वाधिक जास्त बोलत आहेत. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या नावाच्या उमेदवाराची भीती काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना असल्याचा प्रत्येय बऱ्याच प्रचार सभेतून येत आहे. खरोखरच एकाच नावामुळे किती गोंधळ होतो, हे फक्त हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंनाच अनुभव आला आहे.

Last Updated : Apr 6, 2019, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details