हिंगोली- कोट्यवधी रुपये खर्च करून हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची टोलेजंग इमारत उभारली आहे. नुकतेच कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. लगेचच ३२ हजार रुपयांच्या थकीत बिला पोटी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचा विद्युत पुरवठा विद्युत विभागाने खंडित केला आहे. त्यामुळे येथे कामकाजासाठी येणाऱ्या लोकांची हेळसांड होत आहे.
हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विद्युत पुरवठा बील न भरल्याने खंडीत - bill
इमारतीत कामासाठी येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचे बारकाईने नियोजन केलेले आहे. मात्र, विद्युत महावितरण कंपनीच्यावतीने इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाचे स्थलांतर काही दिवसांपूर्वी नवीन इमारतीमध्ये झाले आहे. या सुसज्ज इमारतीत सर्वच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. इमारतीत कामासाठी येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचे बारकाईने नियोजन केलेले आहे. मात्र, विद्युत महावितरण कंपनीच्यावतीने इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचारीही थेट वीज भरणा न केल्याने विद्युत पुरवठा बंद असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या आशेने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. वास्तविक पाहता इमारत परिसरात, जनरेटरची सुविधा आहे. मात्र, तरीही हा विभाग महावितरणवरच का अवलंबून असेल, याचा काय अजून ताळमेळ लागलेला नाही. तर विद्युत पुरवठा नसल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिक खेटे घेत आहेत. शिवाय सर्वच कामे खोळबंली असून, कार्यालयाच्या बाहेर वाहनाच्या देखील लांबलचक रांगा लागलेल्या आहेत.
केवळ बिल भरणामुळे या कार्यालयातील विद्युत पुरवठा तोडला जात असेल तर याहून दुर्दैव कोणते? वीज या इमारतीचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी कामासाठी वापरलेली आहे. त्यामुळे त्या गुत्तेदारांनी हे बिल भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी भरले नाही, बिल भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले. तर गुत्तेदारांच्या प्रतीक्षेत दिवस लोटले जात असल्याने, येथे येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. सोबतच भव्य टोलेजंग इमारतीत अंधकार पसरला आहे.