महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोवंशाचे सांगाडे घेऊन जाणाऱ्या ट्रकची हिंगोलीत तोडफोड

हिंगोलीहून नांदेडकडे एका ट्रकमधून गोवंश प्राण्यांचे सांगाडे जात असल्याची माहिती सावरखेडा येथील ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थांनी सदर ट्रक अडवून ट्रकमधील सांगाड्याची पाहणी केल्यानंतर सुमारे १०० च्यावर प्राण्यांचे सांगाडे असल्याची खात्री ग्रामस्थांना पटली. नंतर ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करीत सदर वाहनावर प्रचंड दगडफेक केली.

By

Published : May 10, 2019, 11:12 PM IST

ट्रकमध्ये १०० च्यावर प्राण्यांचे सांगाडे होते.

हिंगोली- गोवंशबंदीतही गोवंश हत्या सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कळमनुरी - हिंगोली रोडवरील सावरखेडा येथे ट्रकमध्ये गोवंशिय प्राण्यांच्या सांगाड्यांची वाहतूक करणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडला. वाहनाला अडवून वाहनाची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळपास एक तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

गोवंशाचे सांगाडे घेऊन जाणाऱ्या ट्रकची हिंगोलीत तोडफोड करण्यात आली आहे.

हिंगोलीहून नांदेडकडे एका ट्रकमधून गोवंश प्राण्यांचे सांगाडे जात असल्याची माहिती सावरखेडा येथील ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थांनी सदर ट्रक अडवून ट्रकमधील सांगाड्याची पाहणी केल्यानंतर सुमारे १०० च्यावर प्राण्यांचे सांगाडे असल्याची खात्री ग्रामस्थांना पटली. नंतर ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करीत सदर वाहनावर प्रचंड दगडफेक केली. यात वाहनाच्या समोरील सर्व काचा फोडल्या. या घटनेने हादरलेल्या वाहनचालक अन त्याच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर प्रचंड दगड फेक होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जागीच थांबली होती. या प्रकाराने हिंगोली-कळमनुरी रस्त्यावर सुमारे १ तास वाहतूक सेवा कोलमडली. हिंगोली व बासंबा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर सदर प्राण्यांचे सांगाडे वाहून येणाऱ्या ट्रकला ताब्यात घेत पोलिसांनी बासंबा पोलीस ठाण्यात नेले.

वाहनाची माहिती ग्रामस्थांना मिळालीच कशी ?

गोवंशीय सांगडे घेऊन येणारे वाहन नांदेडमार्गाने जात असल्याबद्दलची माहिती सावरखेडा येथील ग्रामस्थांना मिळालीच कशी? नंतर अचानक एवढा उद्रेक झाला कसा? याबद्दल जिल्ह्यात तर्कवितर्क लावले जात आहेत. सदर माहिती ही ग्रामस्थांना पोलिसांनी तर दिली नसावी का याबद्दलही तर्कवितर्क आहे. या घटनेमुळे हिंगोली कळमनुरी रस्त्यावर निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? असा ही प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. जवळपास दोन ते तीन किमी रांगा लागलेले वाहन चालक चांगलेच ताटकळत बसले होते. या प्रकरणी बसंबा पोलीस ठाण्यात वाहन चालका विरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वाहनाचे नुकसान झाल्याप्रकणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या घटनेची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details