हिंगोली -येथील राज्य राखीव दलातील जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश पाठविणाऱ्या जवानाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन मांयदळे असे निलंबित जवानाचे नाव आहे. यांबंधित आदेश राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक ईप्पर यांनी दिले आहेत.
सचिन मांयदळे हा राज्य राखीव दलात बँड पथकात कार्यरत होता. या जवानाने काही दिवसांपासून राखीव दलातील दुसरीकडे कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला व्हाट्सअप वरून अश्लील संदेश पाठविले. जवान हा कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर पत्नीने सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यामुळे महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सचिन मायंदळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने त्या जवानाला ताबडतोब ताब्यात घेतले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.