हिंगोली - सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा चांगलाच हैराण झालेला आहे. अशा भेदरलेल्या परिस्थिती स्वतःला धीर देऊन अनेक शेतकरी शेतात राबत आहेत. अशाच एका पपई उत्पादक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल न होता 'शेती ते थेट ग्राहक' पपई विक्री केल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आज हा शेतकरी आपल्या कुटुंबाचा गाडा अगदी सुरळीत चालवत आहे.
शेती ते थेट ग्राहक; पपई उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा - हिंगोली पपई उत्पादन
सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा चांगलाच हैराण झालेला आहे. अशा भेदरलेल्या परिस्थिती स्वतःला धीर देऊन अनेक शेतकरी शेतात राबत आहेत. अशाच एका पपई उत्पादक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल न होता 'शेती ते थेट ग्राहक' पपई विक्री केल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
मात्र नागरे व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुचाकीवर सहा कॅरेट बांधून त्यामध्ये पपई ठेवत गावोगावी जाऊन थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. 30 ते 40 प्रति किलो भाव मिळत असल्याने, यातून नागरे यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. व्यापाऱ्यांना एक ठोक पपईची विक्री केली असती तर दहा ते पंधराच्या वर भाव मिळाला नसता, मात्र शेत ते ग्राहक हा फंडा वापरल्याने, यश मिळत असल्याचे नागरे सांगतात. यासाठी त्यांना घरातील मंडळी पपई तोडण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मजुरांचा खर्च वाचून यातून उत्पन्नात भर पडण्यास मदत मिळते.
पावसाने घातला होता धुमाकूळ
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नागरे यांची पपई सापडली होती. यामुळे ते चांगलेच गोंधळून गेले होते. मात्र घरच्यांनी त्यांना धीर दिला, सर्वांनीच एकमेकांना धीर देण्याचं काम केल्याने आज पपईचं पीक पुन्हा उभी राहण्यास मदत मिळाली. उभ्या राहिलेल्या बागेचे योग्य पद्धतीने संरक्षण केल्याने त्याचे चीज झाल्याचे नागरे सांगतात.