महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत विद्यार्थ्यांनी सोलर फिल्टर चष्म्यातून पाहिले सूर्यग्रहण - solar eclipsed

देशात आज सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी सूर्यग्रहण दिसणार होते. त्यानुसार अनेकांनी सूर्यग्रहण पाहण्याची तयारी केली होती. हिंगोलीमध्ये विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी शाळेच्यावतीने सोलर फिल्टर चष्म्याची व्यवस्था केली होती.

hingoli solar eclipsed
हिंगोली सूर्यग्रहण

By

Published : Dec 26, 2019, 2:05 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहता येणार की नाही, अशी शंका होती. सुरुवातीला ग्रहण दिसले नाही. मात्र, काही वेळानंतर सूर्यग्रहण पाहता आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सोलर फिल्टर चष्म्यामधून सूर्यग्रहण पाहिले.

हिंगोलीत विद्यार्थ्यांनी सोलर फिल्टर चष्म्यातून पाहिले सूर्यग्रहण

देशात आज सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी सूर्यग्रहण दिसणार होते. त्यानुसार अनेकांनी सूर्यग्रहण पाहण्याची तयारी केली होती. विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी शाळेच्यावतीने सोलर फिल्टर चष्म्याची व्यवस्था केली होती. तसेच शहरातील मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर देखील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सूर्यग्रहण पाहिले. तसेच काहींनी हा क्षण कॅमेऱ्यामध्ये देखील कैद केला.

ABOUT THE AUTHOR

...view details