महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; पैसे काढण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांची झुंबड

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाबाहेर एकच गर्दी केली. ते तहान-भूक विसरून बँकेच्या दारात उभे ठाकले होते.

social distancing break at bank in hingoli
सोशल डिस्टिंगचा फज्जा; पैसे काढण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांची झुंबड

By

Published : Apr 13, 2020, 3:10 PM IST

Updated : Apr 13, 2020, 3:24 PM IST

हिंगोली- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने, सर्वत्र सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी विविध बँकाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी गर्दी झाली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; पैसे काढण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांची झुंबड

जिल्ह्यातील विविध बॅंकांसमोर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. अक्षरशः शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अतोनात प्रयत्न केला जात आहे.तर दुसरीकडे शेतकरी दोन हजार रुपयांसाठी तहान भूक विसरून बॅँकेच्या दारात उभे राहिले होते. शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने सोशल डिस्टंन्सिंग राहिले नाही.

हिंगोली जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सूरु आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून जास्तच खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

Last Updated : Apr 13, 2020, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details