हिंगोली- जिल्ह्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. वसमत तालुक्यातील बोराळा येथे एकापाठोपाठ तीन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर एकाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच गावातील तिघांनी एकापाठोपाठ एक मृत्यूला कवटाळल्यामुळे गावकऱ्यांना धक्का बसला आहे.
धक्कादायक! एकाच गावात तीन तरुणांची आत्महत्या - farmer commit suicide
जिल्ह्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. वसमत तालुक्यातील बोराळा येथे एकापाठोपाठ तीन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडालीये. दोघांच्या आत्महत्येप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर एक जणांची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
![धक्कादायक! एकाच गावात तीन तरुणांची आत्महत्या youths commit suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9142795-thumbnail-3x2-hingoli.jpg)
एकाच गावात तीन तरुणांची आत्महत्या
प्रभाकर जाधव, संतोष खराटे, राजू गंगातीरे अशी आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत. 9,10, आणि 11 ऑक्टोबर अशा तीन दिवसात या तिघांनी आत्महत्या केली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. हे तेघेही शेतकरी कुटुंबातील होते. कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान यातून आलेल्या निराशेने या तरुणांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.