महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचाही मृत्यू - Hingoli District News Update

भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, सेनगाव तालुक्यातील जांभरून गावात घडली आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोनच दिवसांपूर्वी अशीच एक घटना माळसेलू येथे देखील घडली होती. नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच आजोबांचा देखील मृत्यू झाला होता.

भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचाही मृत्यू
भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचाही मृत्यू

By

Published : Mar 6, 2021, 4:49 AM IST

हिंगोली-भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, सेनगाव तालुक्यातील जांभरून गावात घडली आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोनच दिवसांपूर्वी अशीच एक घटना माळसेलू येथे देखील घडली होती. नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच आजोबांचा देखील मृत्यू झाला होता.

घटनेने गावात हळहळ

गंगुबाई मारोती दहातोंडे (70) रा. पारोळा ता. जि. हिंगोली असे या मृत बहिणीचे नाव आहे. भाऊ तान्हाजी रुपाजी मुटकुळे (60) यांचा शुक्रवारी सकाळी ह्रदविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गंगुबाई या आपल्या भावाच्या अंत्यविधीसाठी जांभरूनमध्ये आल्या, मात्र भावाला पाहाताच त्यांना रडू कोसळले, आणि क्षणात त्या जमिनीवर कोसळल्या. दरम्यान त्या जमिनीवर कोसळल्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान या प्रकाराने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details