हिंगोली- यंदाही हिंगोली येथे शिवसेनेच्यावतीने कावड यात्रेचे आयोजन केले होते. कावड यात्रा कलमी मार्गे जात असताना मैदानाजवळ अचानक कावड यात्रेवर दगडफेक झाली. यामध्ये अनेक कावड यात्रेकरू जखमी झाले होते. नंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने सौम्य लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याच भयंकर परिस्थितीत चोख कर्तव्य बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन केले. हे चुकीचे असल्याचे म्हणत शिवसेनेच्यावतीने पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृहमंत्र्यांकडे त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे.
हिंगोलीतील 'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची शिवसेनेची मागणी - hingoli police
गणेश ज्ञानदेव वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले.
हिंगोली शहरात कावड यात्रा आणि ईद हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले. कावड यात्रा कळमूरीकडे जात असताना इतका मैदानाजवळ कावड यात्रेवर दगडफेक केली. यामध्ये जवळपास 25 ते 30 वाहनांचे नुकसान देखील झाले होते. हळूहळू हा वाद वाढतच गेला, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेत ताबडतोब शहरात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही केला. त्यानंतर वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अशाच भयंकर परिस्थितीत कर्तव्य बजावलेल्या गणेश ज्ञानदेव वाबळे, विलास शिनगारे, नितीन रामदिनवार या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. वास्तविक पाहता या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावल्यामुळेच पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओवरून पोलीस प्रशासनाने निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे आणि त्या कर्मचऱ्याना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने केली आहे.
या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन दिल्यानंतर खरोखरच पोलीस प्रशासन या निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.