हिंगोली - शिवसेना नेहमीच शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाजूने राहिलेली आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल हाच आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. तसेच दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माप होण्यासाठी शिवसेना देखील धडपडत आहे. मात्र, काही दुष्ट लोग शिवसेनेला बदनाम करायला निघाले आहेत. आदिवासी समाजाच बांधवांची देखील काही जण दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, आदिवासी समाजावर अजिबात गदा येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ ते येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी
पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने कधीही शेतकऱ्यांचा विचार केला नाही. त्यामुळे या भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना अजिबात साथ देऊ नका. तसेच शासन करत असलेल्या कर्जमाफीवर मी अजिबात समाधानी नाही. मला अर्धवट नव्हे तर संपूर्ण कर्जमाफी करायची आहे. त्यासाठी तुमची साथ मला पाहिजे, अशी साद त्यांना जनतेला घातली. तसेच मी सरकारशी नव्हे तर जनतेशी बांधील आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सरकारला धारेवर धरण्यासाठी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. तर आज घडीला विधानसभा निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या भाजप सरकारने 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सगळीकडे मांडला आहे. मात्र, ही कामे करताना शिवसेनेचाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा आहे. त्यामुळे ते विसरून अजिबात चालणार नसल्याचा टोला मित्र पक्षाला लगावला.
हेही वाचा -'हिंमत असेल तर जाहीरनाम्यात कलम 370 परत लागू करण्याचा उल्लेख करा'
शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. मात्र, त्यांनी योग्य दिशेने कामेच केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उतारवयात ही भयानक वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या पक्षाकडे नेता नाही, कार्यकर्ता नाही, अशा पक्षाला आपले मत देऊन वाया घालवू नका, असे आवाहन करत उद्धव यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. या वेळी सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'
....म्हणून ढाळत आहेत अजित पवार अश्रू -