महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत शिवभोजन थाळीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० रुपयात 'शिवभोजन' हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केला. जिल्हासामान्य रुग्णालय परिसरात रविवारी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या थाळीचे उद्घाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी अनेक लाभार्थ्यांनी या थाळीचा लाभ देखील घेतला.

शिवभोजन थाळीची हिंगोलीत सुरुवात
शिवभोजन थाळीची हिंगोलीत सुरुवात

By

Published : Jan 27, 2020, 12:25 PM IST

हिंगोली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'शिवभोजन थाळी'चे हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी या थाळीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांने समाधान देखील व्यक्त केले.

शिवभोजन थाळी उपक्रमाला हिंगोलीत सुरुवात

दिवसेंदिवस वाढत असलेली देशाची लोकसंख्या आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना एक वेळचे जेवणदेखील मिळणे कठीण होऊन बसले आहे. अशाच परिस्थितीत कित्येकजण उपाशीपोटी रात्र काढतात. एवढेच नव्हे तर, पोटाची खळगी भरून काढण्यासाठी वाटेल ते काम करणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर, काहीजणांना धडपड करून देखील अन्न मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० रुपयात 'शिवभोजन' हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केला. जिल्हासामान्य रुग्णालय परिसरात रविवारी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या थाळीचे उद्घाटन करण्यात आले आणि पहिल्याच दिवशी अनेक लाभार्थ्यांनी या थाळीचा लाभ देखील घेतला.

हेही वाचा - हिंगोलीतून संविधान उद्देशिकेच्या वाचनास सुरुवात, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित केले वाचन

याठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना बसून जेवता यावे, अशी व्यवस्थाही करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. पहिल्याच दिवशी जवळपास ९५ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याचे शिवभोजन केंद्राच्या चालकांकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर याठिकाणी येणाऱ्या गोरगरिबांना या भोजनाचा लाभ होणार असल्याने पहिल्याच दिवशी लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात हा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे हा उपक्रम सार्थक असल्याचेही बरेचजण सांगत होते.

हेही वाचा - चव न चाखताच हिंगोलीत पालकमंत्र्यांनी केले शिवभोजन थाळीचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details