हिंगोली- एकीकडे खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये हीच संख्या कमी होत चालली आहे. यामुळे शासकीय शिक्षणावर सतत प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, एका शिक्षकाच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे सेनगाव जिल्हा परिषद शाळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हिंगोलीतील सेनगावच्या जिल्हा परिषेदेतील आदर्श शिक्षक मारोती कोटकर या शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी शब्द अगदी मनोरंजनात्मक शिकवत आहेत. यामुळे विद्यार्थी आनंदी होत नियमित शाळेत येत आहेत. तसेच अभ्यासही मन लावून करत आहेत. यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतेतही वाढ होत आहे.