हिंगोली- जिल्ह्यामध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, कपाशीच्या बियाण्यामध्ये कंपनीने शेतकऱ्याला फलवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या झेंडूकडे आपला मोर्चा वळविला. परंतु त्यामध्येही कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मोठ्या आशेने लागवड केलेल्या झेंडूला फुलेच लागली नसल्याने शेतकऱ्यांनी तहसिलदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
झेंडूच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक हेही वाचा -हिंगोलीतील कयाधु नदी दुसऱ्यांदा 'खळखळली', नदीचे रूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
सध्या कोणत्याही सण समारंभात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हीच संधी साधून, हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, या आशेने पिकाला लहानाचे मोठे केले. वेळेच्या वेळी खत- पाणी देऊन झेंडू फुला योग्य झाला. तरीही झेंडूला फुलेच आली नाहीत. एवढ्या कालावधीतच झेंडूच्या फुलांची विक्री केली जायची. मात्र, यंदाची परिस्थिती उलट आहे. फुले लागण्यायोग्य झेंडूची वाढ झाली तरीही त्याला फुलेच लागली नाहीत. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सेनगाव परिसरात 500 हेक्टरवर झेंडूची लावगड करण्यात आली आहे.
हेही वाचा - पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
दसरा आणि दिवाळीासाठी झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, फुलेच आली नसल्याने शेतकरी हवाल-दिल झाला आहे. सेनगाव भागातील झेंडू उत्पादकांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. कपाशी पाठोपाठ आता झेंडू मध्येही फसवणूक झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.