महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीचे मिनी मंत्रालय सील, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ - हिंगोली जिल्हा परिषद सील

हिंगोली जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालय सील करण्यात आले आहे. या मुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

Seal at Hingoli Zilla Parishad office due to corona crisis
आता हिंगोलीचे मिनी मंत्रालयही केले सील....

By

Published : Jul 17, 2020, 8:07 PM IST

हिंगोली -दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असताना, आज (शुक्रवार) मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयातील आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालय सील केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली शहरातदेखील कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 18 जुलैपर्यंत शहरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यातच 17 जुलै रोजी हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयात असलेल्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे, जिल्हा परिषद कार्यालय सील केले आहे.

सदरील डॉक्टरांच्या संपर्कात असलेल्या आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रशासनाच्यावतीने क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता या डॉक्टरच्या संपर्कात नेमकं कार्यालयातील कोण-कोण आले याची तपासणी केली जात आहे. मात्र, आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या कोरोनाने जिल्हा परिषद कार्यालयातही शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details