हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयालाला शॉटसर्किटमुळे आग ( ZP school fire incident in Hingoli ) लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीत जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बबन जाधव ( ZP headmaster Baban Jadhav on fire case ) यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयातील संपूर्ण साहित्य जळून खाक हेही वाचा-ST कर्मचारी सोमवारपर्यंत रुजू झाल्यास निलंबन मागे घेणार; महामंडळाने काढले आदेश
आगीत शाळेवरील पत्रेदेखील जळून खाक
वाकोडी येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा ( ZP Wakodi school fire incident ) आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने शाळेतील कार्यालयाला आग लागली. यामध्ये कार्यालयातील कोरोना साहित्य, कपाट , 8 कॉम्प्युटर, 3 एलईडी, प्रवेश निर्गम, टीसी बुक, रेकॉर्ड बुक, खुर्च्या, टेबल, पंखे असे एकूण पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक ( Loss of ZP school in fire ) झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग एवढी भीषण होती की आगीचे लोळ हे खिडकीच्या बाहेर निघत होते. आगीत शाळेवरील पत्रेदेखील जळून खाक झाली आहेत.
हेही वाचा-Aryan Khan Drugs Case : आर्यन खानची एनसीबी कार्यालयात हजेरी; अटींच्या शिथिलतेसाठी घेतली उच्च न्यायालयात धाव
शॉटसर्किटमुळे लागली आग
ही शॉटसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत शाळेतील सर्वच महत्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात कागदपत्रे घेण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा-Suspension Of 12 BJP MLA : निलंबित भाजपच्या आमदारांची सुनावणी मंगळवारी