हिंगोली- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. रात्रंदिवस नजर चुकवून तस्कर वाळूची अमाप चोरी करीत आहेत. अशाच परिस्थितीत हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मक्ता भागात वाळू घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची विचारपूस करण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदारासोबत हुजत घालत त्यांच्या वाहनावर दगड फेक केली. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोह बालाजी बोके यांच्या फिर्यादिवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोलीत ट्रॅक्टरची विचारपूस केली म्हणून वाळू माफियांचा पोलीस वाहनावर हल्ला - sand mafia
वाळू घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची विचारपूस करण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदारासोबत हुजत घालत त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
एक अज्ञात ट्रॅक्टरचालक नूरखा साहेब खा पठाण रा. आझम कॉलनी हिंगोली, आयुब खा नन्हे खा पठाण रा. लिंबाळा मक्ता असे आरोपीची नावे आहेत. आरोपी हे वाळूचे ट्रॅक्टर भरून घेऊन येत होते. तर त्यांना पोह. बोके यांनी लिंबाळा मक्ता येथे ट्रॅक्टर थांबविण्यास सांगून त्यांच्याकडे वाळूची विचारपूस करण्यासाठी जात होते. जवळ पोहचतात नूरखा आणि आयुब याने बोके यांच्या सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अन् उभ्या असलेल्या शासकीय वाहनावर दगड फेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये गाडीची काच फुटून तीन हजार रूपयाचे नुकसान झाले. या प्रकाराने मात्र हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून हे स्पष्ट होते की वाळू माफिया वाळूची तस्करी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कोणतेही टोकाचे पाऊल उचलत आहेत.
मागेही काही दिवसापूर्वी ओंढा येथे वाद झाला होता. सध्या जिल्ह्यात एवढी वाळूची चोरी वाढली आहे. तीही नियोजनबद्ध पद्धतीने, जागोजागी दुचाकीवर व्यक्ती पथकावर नजर ठेवून राहतात. एक ते दोन किलोमीटर अंतराच्या फरकाने ट्रॅक्टरच्या मागेपुढे दुचाकी ठेवतात. वाहन अडविण्यासाठी कधीकाळी एखादा कर्मचारी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करत असेल तर थेट त्याच्या वाहनावर हे वाळू माफिया ट्रॅक्टर घालत आहेत. विशेष म्हणजे मागील काही महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनावर देखील ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. आज पुन्हा शासकीय वाहनावर दगडफेक करून पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुजत घातली. दिवसेंदिवस वाळूमाफियांचे धाडस वाढतच जात आहे. एखाद्या वेळेस एकटा दुकटा अधिकारी वाळूची वाहतूक थांबविण्यास गेला तर या आताच्या परिस्थितीवरून काही खैर नाही असेच दिसून येत आहे.