हिंगोली- नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र दारू पार्टीचे नियोजन केले जाते. यातून अपघाताच्या घटना वाढत आहेत. येथील खटकाळी बायपास परिसरात सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी एक ग्लास दूध व एक गुलाबाचे फूल वाहनचालकांना देत त्यांचे स्वागत केले. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि काही सामाजिक संघटनेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता.
गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत; अपघातमुक्तीचा संदेश - गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध
नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र दारू पार्टीचे नियोजन केले जाते. यातून अपघाताच्या घटना वाढत आहेत. येथील खटकाळी बायपास परिसरात सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी एक ग्लास दूध व एक गुलाबाचे फूल वाहन चालकांना देत त्यांचे स्वागत केले.
सरत्या वर्षाला अनेकजण दारू पार्टीचे नियोजन करत असल्याने अनेकदा अपघातांच्या घटना घडत असतात. या घटना कमी करण्याच्या पार्श्वभूमीवरच हिंगोली येथे आगळावेगळा दूध आणि फूल वाटपाचा उपक्रम राबवला आहे. व्यसनमुक्त भारत, अपघातमुक्त भारत, हा एकमेव संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत एक हजार लिटर दूध चालकांना वाटप केले आहे. विशेष म्हणजे, पहाटे पाच वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांमध्ये उपप्रादेशिक परिवहन व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरत्या वर्षाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अपघातमुक्त भारतचा संदेश हा वर्षभर अंमलात आणला तर निश्चितच अपघाताचे प्रमाण टाळण्यास मदत होईल.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फ परिसरातील वाहनांच्या पीयुसीची तपासणी देखील मोफत केली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली नांदेड रस्त्यावर बनवण्यात आलेल्या स्टेजवर अपघात टाळण्यासंदर्भात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात अनेक प्रकारची फलक लावण्यात आली आहेत.