हिंगोली - संविधानाने जो मला अधिकार दिलेला आहे तो मी बजावण्यासाठी प्रत्यक्षात हिंगोली येथे आलो आहे. जिल्ह्यात जो काही सिंचन प्रश्न आहे, त्याची नेमकी काय परिस्थिती आहे. तो पूर्णत्वास गेला की अपूर्ण राहिला आहे, हे पाहण्यासाठी मी हिंगोली येथे आलो असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
जिल्ह्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आलो -
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून (गुरूवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ते नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले. ते शासकीय विश्रामगृह येथे दाखल होताच त्यांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने सलामी देण्यात आली. कोश्यारी यांनी यावेळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. तर मुख्य बाब म्हणजे जिल्ह्यातील सिंचन प्रश्नावर अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. नंतर राज्यपाल यांनी प्रसार माध्यमच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधून, संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आपण दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी पत्रकारांशी सांगितले. येथील सिंचन प्रश्न कसा आहे, किती वाढ झाली, अपूर्ण राहण्याची कारणे काय आहेत, याचा संपूर्ण आढावा घेऊन हा प्रश्नशासनाकडे मांडणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रश्नांचा देखील आढावा घेतला. हे सर्वच प्रश्न राज्य व केंद्र शासनाकडे मांडणार असल्याचे राज्यपाल यांनी सांगितले. तर जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यासंदर्भात विचारणा करताच हा माझा अधिकार नसल्याचे राज्यपालांनी सांगितले.
ऐन वेळेवर देण्यात आली माजी आमदाराला पास -