हिंगोली- गट ग्रामपंचायत असलेल्या सायाळा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ७ ते ८ वयोगटातील बालक डेंग्यू सदृश्य तापाने आजारी पडत आहेत. तर वयोवृद्धांचेही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती अद्यापपर्यंत आरोग्य विभागाच्या एकाही कर्मचाऱ्यांने गावाला भेट दिली नाही.
सायाळा येथे डेंगू सदृश्य तापाचे रुग्ण; नागरिकांत भीतीचे वातावरण - fever
गट ग्रामपंचायत असलेल्या सायाळा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ७ ते ८ वयोगटातील बालक डेंग्यू सदृश्य तापाने आजारी पडत आहेत.
सायाळा गावाची लोकसंख्या जेमतेम ३०० ते ३५० एवढी आहे. नांदुसा आणि राजुरा यांची मिळून सायाळा गट ग्रामपंचायत आहे. गावात अस्वच्छता असल्याने डेंग्यु सदृश्य रुग्ण आढळत आहेत. प्रत्येक घरात एकतरी तापाचा रुग्ण आढळुन येत आहे. आजारी पडणाऱ्यांमध्ये बालकांची संख्या सर्वाधिक आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून हे आजारी पडण्याचे सत्र सुरू आहे. पंरतु या काळात आरोग्य विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही.
तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेक पालक व्याजाने पैसे घेऊन बालकांवर उपचार करीत आहेत. आरोग्य विभागाने गावाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.