महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव - हिंगोली रथोत्सव

श्री नागनाथांची उत्सवमूर्ती रथामध्ये ठेवून रथाची फुलांच्या माळा आणि दिव्याद्वारे सजावट करण्यात आली होती. रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिराभोवती या रथाने ५ प्रदक्षिणा मारल्या.

hingoli
हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव

By

Published : Feb 26, 2020, 2:42 PM IST

हिंगोली - महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र औंढा नागनाथमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री १० वाजता रथोत्सव पार पडला. यावेळी हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव

हेही वाचा -२६ फेब्रुवारी : याच दिवशी पडली होती इंग्रजाविरुद्धच्या लढ्याची पहिली ठिणगी

श्री नागनाथांची उत्सवमूर्ती रथामध्ये ठेवून रथाची फुलांच्या माळा आणि दिव्याद्वारे सजावट करण्यात आली होती. रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिराभोवती या रथाने ५ प्रदक्षिणा मारल्या. या रथोत्सवात भजनी मंडळ, बँड पथक आणि विद्यार्थी ढोलताशांसह सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details