महाराष्ट्र

maharashtra

राजीव सातवांचे पार्थिव आज पोहोचणार हिंगोलीत, उद्या सकाळी 6 वाजल्यापासून अंत्यदर्शन

खासदार राजीव सातव यांचे पार्थिव आज हिंगोलीतील कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे यावेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन तयारी करत आहे.

By

Published : May 16, 2021, 8:34 PM IST

Published : May 16, 2021, 8:34 PM IST

hingoli
हिंगोली

हिंगोली - खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या राहत्या घरी काही वेळात पोहोचणार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी (17 मे) सकाळी 6 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, रस्त्याने येताना सातव यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या रुग्णांवहीकेवर पुष्यवृष्टी केली जात आहे.

खासदार राजीव सातव हे गेल्या 23 दिवसापासून पुणे येथील जहांगीर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती काही प्रमाणात सुधारली होती. शिवाय, त्यांनी कोरोनावरही मात केली होती. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (16 मे) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला.

रुग्णवाहिकेने आणले जात आहे पार्थिव

खासदार राजू सातव यांचे पार्थिव रूग्णवाहिकेतून पुणे येथून कळमनुरीकडे आणले जात आहे. आज रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव कळमनुरी येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने कोरोना नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहे.

त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार 'हे' मंत्री

हिंगोली प्रशासनाच्यावतीने राजीव सातव यांच्या अंत्यविधीची तयारी केली जात आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रामीण भागातून व शहरी भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्तेदेखील दाखल होणार आहेत. गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी ठाण मांडून आहेत.

हेही वाचा -'आता महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल तर कोरोनाचाचणी बंधनकारक'

ABOUT THE AUTHOR

...view details