महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RAJEEV SATAVS WIFE प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर - Rajeev Satavs wife Pradnya Satav

हिगोली मतदारसंघातील काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याठिकाणी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रज्ञा सातव
प्रज्ञा सातव

By

Published : Nov 15, 2021, 3:09 PM IST

Updated : Nov 15, 2021, 3:33 PM IST

हिंगोली- काँग्रेसचे नेते, दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या ( RAJEEV SATAVS WIFE ) पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसच्यावतीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तशी काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने (Hingoli congress celebration) फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची राज्यसभेवर वर्णी लागेल, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र सातव यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, त्याच वेळी त्यांना विधान परिषदेवर (MLC Maharashtra) पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेव्हा कुठे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

हेही वाचा-विष्णुमय जग... कार्तिकी एकादशी निमित्ताने कार्तिकी गायकवाडचे सुरेल अभंग गायन

जिल्ह्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण-

हिगोली मतदारसंघातील काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन (election after congress leader Sharad Ranpise death) झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याठिकाणी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी विधान परिषदेचे तिकीट प्रज्ञा सातव यांना दिल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे.

हेही वाचा-Babasaheb Purandare : बळवंत मोरेश्वर पुरंदरे ते महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जाणून घ्या जीवनप्रवास

प्रज्ञा सातव हिंगोली-कळमनुरीतून राजकारणात सक्रिय

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कॉंग्रेसनेरजनी पाटील (Rajani Patil) यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याची मागणी सुरू होती. मात्र, रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. परंतु, राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव काही महिन्यांत हिंगोली-कळमनुरीतून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे हिंगोलीमध्ये आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी वर्णी लावण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या नेत्यांची नावे चर्चेत होती. पंरतु दिवंगत खासदार राजीव सातव यांचे दिल्लीत असलेले वजन, गांधी कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंधामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा-जळगावमध्ये 1500 किलो गांजा जप्त; मुंबई एनसीबी पथकाची मोठी कारवाई

दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी (4 ऑक्टोबर) रोजी होणार आहे.

Last Updated : Nov 15, 2021, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details