हिंगोली - जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. आज पुन्हा विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - हिंगोलीचा पाऊस
सलग तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. आज पुन्हा विजेच्या कडकडाटासह पावसाने हिंगोली जिल्ह्यात हजेरी लावली.
मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून काही प्रमाणात सावरलेले शेतकरी शेतीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत. पडलेल्या पावसाचे पाणी जागोजागी साचल्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
आज चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून शेतकऱ्यांना व नागरिकांना देखील त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.