महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 29, 2019, 6:34 PM IST

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; बळीराजाला दिलासा

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, खंडाळा, जयपूरवाडी या भागात आज पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पावसाची हजेरी; बळीराजाला दिलासा

हिंगोली -औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, खंडाळा, जयपूरवाडी या भागात आज पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पावसाची हजेरी

खरिपाचे पीक तोंडाशी आल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आज पावसाने काही प्रमाणात का होईना हजेरी लावल्याने सोयाबीन आणि तूर ही पिके धोक्याबाहेर आली आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला नसल्याने अजूनही काही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या पोळा सणाची आज कर आहे. त्यामुळे सर्व शेतकरी खांदे मळणीच्या कामात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात सणाचे औचित्य साधून आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details