महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत रिमझिम पावसाची हजेरी; रब्बी पिकांना होणार फायदा - रिमझिम पाऊस

हिंगोलीत बुधवारी रिमझिम पाऊस बरसला. पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

FILE PHOTO
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Dec 26, 2019, 5:57 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री दहा वाजताच्या दरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा काही प्रमाणात रब्बीच्या पिकासाठी उपयोग होऊ शकतो.

यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे विहीर व बोअरला देखील भरपूर पाणी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली. बुधवारी झालेल्या रिमझिम पावसाने काही प्रमाणात त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाच ते सात मिनिट झालेल्या पावसामुळे रस्ते पूर्णपणे भिजले होते. पावसामुळे काही काळ विद्युत पूरवठा खंडित झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details