हिंगोली - प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा झाला आहे. शनिवारी सकाळपासुनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
हिंगोली जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी; बळीराजा सुखावला - बहुतांश ठिकाणी
जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. आज घडीला 25 टक्केच्या वर पेरणी झालेल्या आहेत.
शेतकऱयांनी पेरण्या केल्या
हिंगोली जिल्ह्यात चार दिवसापासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने उघडीप दिलेल्या काळात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी पेरणी सुरू होती. मृग नक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने शेतकरी आता बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरने पेरणी करून घेत आहेत. आज घडीला 25 टक्क्यांच्यावर पेरण्या झालेल्या आहेत.