हिंगोली - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वसमत तालुक्यात विविध भागांतील झाडे उन्मळून पडली. ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील २५० ते ३०० घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक जण जखमी झाले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गावात एकच गोंधळ उडाला.
हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस; घरावरील पत्रे उडाली, अनेक जण जखमी - Aundha Nagnath
ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील २५० ते ३०० घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक जण जखमी झाले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, गावात एकच गोंधळ उडाला. मात्र या बेमोसमी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना सुटका झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मान्सुनपूर्व पाऊस होत आहे. यामुळे येथील नागरिकांची तारांबळ उडत आहे. होत असलेल्या पावसामुळे वसमत, औंढा आणि कळमनुरी या भागातील झाडे उन्मळून पडली आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येथे टीन पत्रावरील दगड डोक्यात पडल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले. तर गाईच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने बऱ्याच गुरांना जखमा झाल्या आहेत. असे असले तरीही, या बेमोसमी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना सुटका झाला आहे.