महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाडीत न बसण्याच्या कारणावरून शिवसेना तालुका प्रमुखाला जबर मारहाण; हात फॅक्चर - जिल्हासामान्य रुग्णालयात

औंढा तालुक्याचे शिवसेना प्रमुख साहेबराव देशमुख यांना माझ्या गाडीत का बसत नाही, असे म्हणत चार ते पाच जणांनी जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली येथे घडली. यामध्ये त्यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे.

जखमा साहेबराव देशमुख

By

Published : Jun 23, 2019, 4:42 PM IST

हिंगोली- माझ्या गाडीत का बसत नाही असे म्हणत चार ते पाच जणांनी शिवसेना तालुका प्रमुखांना जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली येथे घडली. यामध्ये त्यांचा डावा हात फॅक्चर झाला असून, अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुका शिवसेना प्रमुख साहेबराव देशमुख यांनी घटनेची माहिती दिली

औंढा तालुक्याचे शिवसेना प्रमुख साहेबराव देशमुख हे शनिवारी एका मित्रासोबत हिंगोली येथे खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यावर ते बसस्थानक परिसरात प्रवाशी गाडीने घराकडे जाण्यास निघाले. त्यांनी बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या खासगी प्रवासी वाहनाचालकाला गाडी कधी सुटणार अशी विचारणा केली. गाडीत प्रवाशी नसल्याने मला निघायला उशीर होईल असे वाहनचालकाने सांगितले. त्यामुळे ते ओंढा मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वाहनाच्या प्रतीक्षेत थांबले. दरम्यान एक पांढऱ्या रंगाची गाडी आली अन त्यांनी थेट देशमुख यांना धमकावून गाडीत बसण्याचे सांगितले. देशमुख यांनी गाडीत बसण्यास विरोध केला.

साहेबराव देशमुख यांना गाडीतील काही जणांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी अजून काही जणांना फोन करून बोलावले. त्यांनी सोबत लोखंडी रॉड व इतर साहित्य घेऊन आले. एक जण डोक्यावर रॉड मारणार तोच त्यांनी डाव्या हाताने अडवला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा वाद बराच वेळ चालला. दरम्यान काही नगरिकांनी हस्तक्षेप करत वाद थांबवला. त्यांच्या मित्राने देशमुख यांना जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. देशमुख यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले असल्याचे जिल्हासामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

घटनास्थळी देशमुख यांच्या सोबत एक मित्र होता. त्याला जास्त मारहाण नाही. सध्या देशमुख यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्यापही याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र अचानक शिवसेना तालुका प्रमुखांवर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील वसमत तालुक्यात एका भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details