हिंगोली - सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे एका मनोरुग्णाने आजी व मावशीवर कुऱ्हाडीने वार करत खून केल्या घटना पुढे आली आहे. ही घटना शनिवार (आज) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नरसी पथक दाखल झाले आहे. शिवाय घटनेचा पंचनामा सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रोहिदास चराटे असे आरोपीचे नाव आहे. तर मंगलाबाई उत्तम बशीरे (४०, रा. परभणी) आणि देवकाबई किशन पहारे (७०) अशी मृतकांची नावे आहेत. चराटे यांच्या घरी नेहमीच वाद होत होते, त्यामुळे मंगलाबाई आपल्या बहिणीकडे काही दिवस राहण्यासाठी आल्या होत्या. तर रोहिदास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने मावशीचेदेखील त्याच्यासोबत अधून-मधून भांडण होत होते. शेवटी रागाच्या भरात आरोपी रोहिदासने वाद करत मावशीवर कुऱ्हाडीने वार केले. तर हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या आजीवरही रोहिदासने वार केला. यामध्ये मावशीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी आजीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आजीचाही मृत्यू झाला आहे.
पंधरा दिवसापूर्वी गावातील युवका सोबत केली होती मारहाण