महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने बनविली बहुपयोगी सायकल - hingoli primary school student

अमरने मोठ्या उत्साहात आपण केलेल्या प्रयोगाची प्रस्तावना सांगत सायकलचे मानवी जीवनात असलेले महत्व पटवून दिले आहे. यामुळे त्याच्या या प्रयोगाने राज्यमंत्री बच्चू कडूदेखील प्रभावित झाले आहेत. यामुळे अमरचा सायकल प्रयोग कुतूहलाचा विषय बनला आहे.

Primary school student from hingoli present special cycle in science exhibition in amravati
हिंगोलीतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने बनविली बहुपयोगी सायकल

By

Published : Feb 11, 2020, 12:06 PM IST

हिंगोली - हिंगोलीतील सेनगाव येथील येवले प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बहुपयोगी सायकल बनविली आहे. विशेष म्हणजे फक्त पंधराशे रुपयांत त्याने ही सायकल बनविली आहे. अमर संजय पेनूरकर, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने बनविलेल्या या प्रयोगाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. अमरावती येथे हे विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. या विद्यार्थ्याने बनविलेल्या या सायकलला पाहून ते भारावून गेले होते.

हिंगोलीतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने बनविली बहुपयोगी सायकल

हेही वाचा - पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अमरने मोठ्या उत्साहात आपण केलेल्या प्रयोगाची प्रस्तावना सांगत सायकलचे मानवी जीवनात असलेले महत्व पटवून दिले आहे. यामुळे त्याच्या या प्रयोगाने राज्यमंत्री बच्चू कडूदेखील प्रभावित झाले आहेत. यामुळे अमरचा सायकल प्रयोग कुतूहलाचा विषय बनला आहे.

अशी आहे सायकल -

अमरने भंगारमध्ये टाकलेल्या सायकलला दुरुस्त करून अवघ्या पंधराशे रुपयांत बहुपयोगी सायकल बनवली. या सायकलवर मानवी जीवनात अतिमहत्वाची असलेली अनेक कामे करता येतात. यासोबतच शरीराला असलेली व्यायामाची गरज यातून पूर्ण करता येऊ शकते. या सायकलच्या आधारे कपडे धुणे, सुकवणे, त्याचबरोबर घरातील विळा, चाकू, कातर याची धार लावता येते. सोबतच रईदेखील लावणे शक्य होते. सायकलमुळे शारिरीक व्यायाम होऊन, विजेची व इंधनाची बचत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details