संत नामदेवांच्या जन्मस्थळी परतवारी दर्शनासाठी होणार भाविकांची मांदियाळी; सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आषाढी वारी नंतर येणाऱ्या एकादशीला विठोबा संत नामदेवांच्या भेटीला येतात, अशी अख्यायिका आहे. ही वारकरी परंपरा परतवारी सोहळ्याच्या निमित्ताने जपली जाते. पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले वारकरी संत नामदेवांच्या दर्शनासाठी येथे आवर्जून हजेरी लावतात.
संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व नामदेव भक्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने नरसीमध्ये दाखल होत असतात.