महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्याच्या गर्भवती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या - crime

हिंगोली शहर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गर्भवती पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. मृत महिला सात महिन्याची गर्भवती होती

शासकीय सामान्य रूग्णालय, हिंगोली

By

Published : Jun 29, 2019, 11:08 AM IST

हिंगोली- शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गर्भवती पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. राधा गुलाबराव होंडराव (वय २२ वर्षे, रा. नाईक नगर, हिंगोली) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


गुलाबराव होंडराव हे मागील काही दिवसांपासून नाईक नगर भागात पत्नीसाबत राहत आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावून घरी आले. त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजविला, आवाजही दिले. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. घरासमोर परिसरातील नागरिक व महिलांची एकच गर्दी जमली होती. यातील काही महिलांनीदेखील दरवाजा वाजवून आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी काही जणांनी घरात डोकावून पाहिले तर होंडराव यांची पत्नी स्वयंपाक खोलीतील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबंड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेतली. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, मृतदेह शेवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे.


मृत महिला ही सात महिन्याची गर्भवती होती. मात्र, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, महिलेच्या नातेवाइकांची प्रतिक्षा करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घोरबंड यांनी दिली. या घटनेने मात्र हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details