महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hingoli : वनविभागाने पातोंडा येथील शेकऱ्यांवर केलेली कारवाई चुकीची - प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर हिंगोली दौरा

तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाने ( Hingoli Farmer Encroachment On Forest Land ) अतिक्रमण काढण्याची जी मोहीम राबवली, ती अतीशय चुकीची होती, तेथे पोलीस प्रोटेक्शन नव्हते, मग तेथे जे इतर 100 जण आले होते, ते कोण होते, असा सवाल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar In Hingoli ) यांनी केले आहे.

hingoli
hingoli

By

Published : Jan 30, 2022, 5:00 PM IST

हिंगोली - तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाने ( Hingoli Farmer Encroachment On Forest Land ) अतिक्रमण काढण्याची जी मोहीम राबवली, ती अतीशय चुकीची होती, तेथे पोलीस प्रोटेक्शन नव्हते, मग तेथे जे इतर 100 जण आले होते, ते कोण होते ज्यात संभाजी चिमाजी मिरटकर या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला? असा सवाल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar In Hingoli ) यांनी केले आहे. मी स्वतः सरकारकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. त्यामुळे पुन्हा पातोंडा येथील प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता आहे.

'हे प्रकरण अजिबात दबू देणार नाही' -

हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले वंचितचे सर्वसर्वां प्रकाश आंबेडकर यांनी पातोंडा येथे धाव घेऊन, विषप्राशन केलेले पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली तालुक्यातील पातोंडा येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी वनविभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी 5 जानेवारी रोजी वनविभागाचे कर्मचारी मोठ्या फौज फाट्यासह दाखल झाले होते. हे साफ चुकीचे होते. वनविभागाच्या या अमानुष हल्ल्याला कंटाळूनच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अन पोलीस प्रशासन यात थातूर मातूर कारवाई करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र, आम्ही हे प्रकरण अजिबात दबू देणार नाही.

या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी -

गोरगरीब लोक शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. मात्र, वनविभागाने या गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार करायला नको होता. त्यांना अतिक्रमणच काढायचे होते, तर मोजक्याच शेतकऱ्यांचे का? सर्वांचेच काढायचे होते. केवळ मोजक्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण हटवून त्यांना वाऱ्यावर सोडायचा हा वनविभागाचा फंडा अंत्यत चुकीचा आहे. तसेच घटनास्थळी पोलीस संरक्षण नव्हते, मग इतर जे होते, ते नेमके कोण होते. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा - भाई का म्हणाला नाहीस म्हणून तरुणाला मारहाण.. 'त्या' भाईच्या सहकाऱ्यांची मुंडन करून धिंड

ABOUT THE AUTHOR

...view details