महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची घोर निराशा' - वाभिमानी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विम्या संदर्भात जी घोषणा केली. ती प्रधान मंत्री पीक विमा नसून, कार्पोरेट कंपनी पीक विमा योजना झाली, अशी टीका स्वाभिमानीच्या पूजा मोरे यांनी केली आहे. वसमत येथे एका स्नेहसंमेलन कार्यक्रमा दरम्यान त्या बोलत होत्या.

pooja-more-comment-on-financial-budget-in-hingoli
पुजा मोरे

By

Published : Feb 3, 2020, 1:34 PM IST

हिंगोली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामधून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. ज्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना अपेक्षा होती, त्यावर देखील पाणी फिरले आहे. त्यामुळे मोदी सरकारची पीक विमा योजना ही प्रधान मंत्री कार्पोरेट कल्याण योजना झाली का? असा प्रश्न स्वाभिमानी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी केला आहे. वसमत येथे एका स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांची घोर निराशा - पुजा मोरे

अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष करुन शेतकऱ्यांना या बजेटमधून काहीतरी दिलासा मिळेल अशी मोठी अपेक्षा होती. मात्र, यात शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. मोदी सरकारने सोलार कृषी पंप ऐवजी नदीजोड प्रकल्पासाठी निधी दिला असता तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. मात्र, ते सोडून सरकारने सोलार कृषी पंपासाठी पैसे दिले.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विम्या संदर्भात जी घोषणा केली. ती प्रधान मंत्री पीक विमा नसून, कार्पोरेट कंपनी पीक विमा योजना झाली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मोदी सरकार 2019 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगत होते. मात्र, नेहमीप्रमाणे यावर तारीख पे तारीख सुरू असल्याने उत्पन काही वाढलेले नाही, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा-एकाच कुटुंबातील १० जणांचा आपघाती मृत्यू , मुलीचे रिसेप्शन आटोपून परतत होते घरी

ABOUT THE AUTHOR

...view details