महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; हिंगोली पोलीस मुख्यालयातील घटना - hingoli police suicide latest news

जितेंद्र काळी हे पोलीस मुख्यालयात क्षेत्र दुरुस्ती कार्यालयात कार्यरत होते. शनिवारी त्यांच्या कार्यालयातून तीनच्या सुमारास अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. यावेळी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले तर काळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

dead jitendra sali
मृत जितेंद्र साळी

By

Published : Jun 20, 2020, 5:08 PM IST

हिंगोली -येथील पोलीस मुख्यालयात क्षेत्र दुरुस्ती विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. ही घटना आज (शनिवारी) 3 वाजेच्या सुमारास घडली. जितेंद्र गोकुळ साळी (वय - 45, रा. कळमनुरी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

जितेंद्र काळी हे पोलीस मुख्यालयात क्षेत्र दुरुस्ती कार्यालयात कार्यरत होते. शनिवारी त्यांच्या कार्यालयातून तीनच्या सुमारास अचानक आवाज झाला. यावेळी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले तर काळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

हेही वाचा -मेळघाटात आणखी एक अघोरी कृत्य; २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके

त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासादरम्यान त्यांना मृत घोषित केले. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेने पोलीस मुख्यालयातील कर्मचारी चांगलेच हादरून गेले आहेत. तर या प्रकरणी अजून कोणतीही नोंद करण्यात आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details