महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिनेस्टाईलने पाटलाग करून तीन दरोडेखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात; पाच फरार

नेहमी प्रमाणे कळमनुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीची गस्त घालत होते. त्यांना वाटेत काही संसशयित हालचाली आढळून आल्या. यावेळी एका गाडीची चौकशी केली असता सदरील चोरट्यांनी गाडीसह पलायन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून गाडीसह तिघांना ताब्यात घेतले.

By

Published : Jul 17, 2019, 9:13 AM IST

पोलिसांनी जप्त केलेली हत्यारे

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात सिनेस्टाईलने पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दरोडेखोरांना वाहनासह ताब्यात घेतले. तर पोलिसांना पाहून पाच दरोडेखोर फरार झाले आहेत. ही कारवाई आज पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेली दरोडे खोरांची कार

रमेश मनोहर भोसले ( कळमनुरी), सचिन गुरुलिंग शिंदे, आकाश गजानन वाघमारे (वसमत) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाटमारी व चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे कळमनुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीची गस्त घालत होते. त्यांना वाटेत काही संशयित हालचाली आढळून आल्या. यावेळी एका गाडीची चौकशी करायला गेले असता सदरील चोरट्यांनी गाडीसह पलायन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून गाडीसह तिघांना ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेत पाच दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, सुनील अंभोरे आदींनी केली. ताब्यात असलेल्या आरोपींकडून पळून गेलेल्या आरोपींची माहिती काढण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, यावेळी आरोपी चौकशीला प्रतिसाद देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात केलेल्या चोऱ्या व वाटमाऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details